Type Here to Get Search Results !

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अनिल घरतकर, उपाध्यक्षपदी संजीवनी येरणे

 


जि.प. प्राथमिक शाळा बाराभाटी येथे निवड प्रक्रिया उत्साहात पार

बाराभाटी | प्रतिनिधी :- 


जि.प. प्राथमिक शाळा बाराभाटी येथे दिनांक 19 सप्टेंबर 2026 रोजी शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक सरस्वताबाई चाकाटे होत्या. यावेळी पोलीस पाटील सौ. हेमलताबाई खोब्रागडे, तं.मु. अध्यक्ष श्रावण मेंढे, सहशिक्षक लोकेश मेश्राम सर तसेच मेश्राम सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत शाळेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर श्री. अनिल दुधरामजी घरतकर यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी, तर सौ. संजीवनी किशोर येरणे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच श्री. सी. एस. मेश्राम सर, मुख्याध्यापक यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

समितीच्या सदस्यपदी विजय धानगाये, ज्योती अलोणे, उषा धानगाये, जया चौरीकर, लक्ष्मी बंशोड, ममता मेश्राम, शिशुपाल बेलखोडे, पदमाकर रंगारी आणि मुरलीधर मेश्राम यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व सदस्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments